एका चुकीने नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली: दक्षिण कोरिया आणि जर्मनी या दोन देशांनी कोरोना विषाणूसंदर्भात खूपच दक्षता घेतली. अथक प्रयत्न करत हे दोन्ही देश कोरोनाव्हायरसवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले.

या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टिंग करण्यात आलं होतं, शिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही करण्यात आलं. ज्यामुळे या ठिकाणी कोरोनामुळे जास्त मृत्यू झाले नव्हते.

मात्र त्यांची एक चूक चांगलीच महागात पडली. सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिल्यानं इथं कोरोना संक्रमणाची प्रकरणं झपाट्यानं वाढू लागलीत.

गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियात क्लबमध्ये जाणारे कित्येक लोकं संक्रमित झाले. त्यानंतर दक्षिण कोरियानं जवळपास 2100 नाइट क्लब, बार आणि डिस्कोथेकवर बंदी घातली आहे.

दक्षिण कोरियाच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितलं की, गेल्या 24 तासांत 18 नवी प्रकरणं आली आहेत. शनिवारी 3 क्लबमध्ये गेलेल्या 29 वर्षाच्या एका व्यक्तीशी संबंधित ही सर्व प्रकरणं आहेत. ही व्यक्ती या सर्वांच्या संपर्कात आली होती.

जर्मनीत कोरोनाव्हायरसची नवीन प्रकरणं प्राण्यांच्या कत्तलखान्यात सापडलीत. जर्मनीची अर्थव्यवस्था सुरू केल्यानंतर हे आव्हान उभं ठाकलं.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 कत्तलखान्यात व्हायरस संक्रमण असल्याचं सांगितलं, यापैकी 2 पश्चिम जर्मनी आणि एक उत्तर जर्मनीतील आहे.

यानंतर आता दोन्ही देशांनी दुसऱ्या फेजचा सामना करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment