गुगलमध्ये होतेय नोकरीची मेगाभरती अर्ज करण्यासाठी हे वाचाच !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्हाला जर गुगलमध्ये नोकरी मिळाली तर? ज्याची बुद्धी शाबूत आहे असा मनुष्य तरी हि सुवर्णसंधी लाथाडणार नाहीच. गुगलमध्ये नोकरी म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव असतो.

तर सांगायची गोष्ट ही कि 2020 मध्ये गुगलने आपल्या कंपनीसाठी 3 हजार 800 कर्मचारी भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Google Operations Centreचे वाईस प्रेसिडेंट टोरी डिकरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षात गुगल अमेरिकेत गुगुल ऑपरेशन सेंटर सुरू करणार असल्याचं सांगितलं. 

https://careers.google.com  या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊन कोणत्या पदांसाठी जागा रिक्त आहेत ते पाहू शकता. या संकतेस्थळावर तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला ज्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे तो पर्याय निवडा आणि अर्ज भरा.

अर्ज भरल्यानंतर तुमची चाचणी होईल.20 लाख लोकांमधून केवळ 5 हजार उमेदवार निवडले जातात. त्यातूनही मुलाखती होवून अंतिम उमेदवरांची निवड केली जाते.

नोकरी साठी तुमच्यात हव्यात या पात्रता

इंग्रजी भाषेची उत्तम जाण,

उत्तम लिखाणाचं ज्ञान 

संगणकाचं उत्तम ज्ञान 

आय क्यू लेवल, हजरजबाबीपणा,

चिकाटी आणि तप्तरता 

नोकरीला अनुसरून शैक्षणिक पात्रता

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment