Robot Anchor : भारतात पहिली रोबोट अँकर लॉन्च! पहिल्याच बातम्यात मोदींबाबत केले हे भाष्य…

Ahmednagarlive24 office
Published:

Robot Anchor : आजकाल जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वकाही सहज करणे शक्य झाले आहे. जगामध्ये दिवसेंदिवस नवनवीन शोध लावले जात आहेत. तुम्ही रोज टेलिव्हिजनवर बातम्या पाहत असताल. पण या बातम्यांमध्ये तुम्हाला अनेकदा महिला किंवा पुरुष अँकर दिसतो.

पण आता बातम्या सांगण्यासाठी महिला किंवा पुरुषांची गरज पडणार नाही. कारण आता महिला आणि पुरुष अँकरची जागा एका रोबोट महिला अँकरने घेतली आहे. हे जाणून तुम्हालाही आचार्य वाटेल की सर्वसामान्य अँकरसारखे हा रोबोट अँकर सुद्धा बातम्या सांगता आहे तसेच हालचाल देखील सामान्य आहे.

इंडिया टुडे ग्रुपकडून देशामध्ये पहिला अँकर रोबोट लॉन्च करण्यात आला आहे. हा रोबोट सेम महिला अँकरसारख्याच बातम्या सांगत आहे. त्यामुळे आता येत्या काळात अँकरची जागा रोबोट घेणार असेच चित्र दिसत आहे.

या रोबोटचे नाव सना ठेवण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ‘टेक्स्ट टू स्पीच यामुळे हे सर्व काही शक्य झाले आहे. तुम्ही रोबोटला प्रश्न विचारले तर सहज हा रोबोट तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो.

‘टेक्स्ट टू स्पीच’ म्हणजे काय?

मजकुराचे भाषांतरात रूपांतर करणे हे काही नवीन नाही. आजकाल हे सर्वकाही गुगलवर देखील करता येऊ शकते. पण हे सर्व स्क्रिप्टपुरते मर्यादित होते. पण २०१८ मध्ये चीनने पहिला AI न्युज अँकर जगासमोर आणला.

पण त्यावेळी या रोबोटकडे काही विशेष लक्ष देण्यात आले नाही. पण २०२३ मध्ये ChatGPT-4 समोर आले आहे. त्यामुळे आता याकडे लक्षकेंद्रीत झाले. ChatGPT-4 येताच त्याने मार्केटमध्ये जम बसवला आहे.

काहींनी ChatGPT-4 कंपनीच्या सॉफ्टवेअरशी जोडले तर काहींनी चक्क कंपनीचे सीईओ बनवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता 1960 पासून अस्तित्वात आहे पण काही दिवसांपासून सर्वजण याकडे वळायला लागले आहेत.

हे कसे कार्य करते?

‘टेक्स्ट टू स्पीच टू व्हिडिओ’. कृत्रिम बुद्धिमत्तेसह वाचण्याचे देखील काम करत आहे. या रोबोटमध्ये मानवी चेहरा बसवण्यात आला आहे. या रोबोटला मशीन न दाखवता मानवी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आवाजासाठी speech recognition चा पर्याय वापरला जात आहे. खूप साऱ्या लोकांचा आवाजांचे नमुने घेऊन या रोबोटला AI पद्धतीने दिले जातात. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल किंवा सिरी किंवा अलेक्साला पहिल्यांदा कमांड दिल्या असतील, तर तुमच्या आवाजाचे नमुने घेतले असतील.

वेबसाइट झूम मीटिंगपासून बातम्या वाचण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी AI अँकर बनवते. तुमच्या गरजेनुसार तो मीटिंगला उपस्थित राहू शकतो आणि बातम्याही वाचू शकतो. तुमच्या मनात एक प्रश्न असेल की हे सर्व तो स्वतः करतो का? तर नाही त्यासाठी इनपुट आवश्यक आहे. इनपुट म्हणजे AI चॅट बॉटला दिलेली माहिती.

उदाहरणार्थ, त्या रोबोटला तुम्हाला एक कमांड द्यावी लागेल. तेव्हाच ते पुढील कार्य करू शकते. तुम्ही जितके इनपुट या रोबोटला द्याल तितकी माहिती तो तुमच्यापर्यंत पोहोचवेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe