रस्त्यातच पेट्रोल संपलं ? ‘हा’ नंबर डायल करा, तुम्हाला हवे तेथे पोहोच होईल इंधन

Ahmednagarlive24
Published:

आज असा एकही व्यक्ती सापडणारनाही की ज्याच्याकडे स्वतःची गाडी नाही. आज बहुतांश लोकांकडे स्वतःची टुव्हीलर का होईना पण आहे. आज फायनासची सोय झाल्यामुळे लोक बाईक, चारचाकी वाहने घेतात. आपल्या वाहनाने अनेक लोक दूरच्या प्रवासाला देखील जातात.

परंतु एकसमस्या अशी आहे की ज्याचा सामना अनेक लोकांनी केला असेल. ही समस्या म्हणजे बाईक किंवा चारचाकी वाहनांमधील पेट्रोल संपणे. अनेकदा आपल्या वाहनातील पेट्रोल भर रस्त्यात संपते. अशावेळी आपल्याला गाडीला धक्का देत पेट्रोल पम्प गाठावा लागतो.

आता कल्पना करा की भररस्त्यात मधेच तुमचे वाहन पेट्रोल नसल्याने बंद पडले आहे. तुम्ही गाडी ढकलत आहात. वर उन्हाचा कहर आहे. काय झालं? कल्पना करूनच नको वाटलं ना ! मग थांबा. आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त आयडिया सांगणार आहोत.

बसल्या जागेवर पेट्रोल ऑर्डर करू शकता !

अशी एक सेवा, सुविधा सुरु आहे की तुम्ही बसल्या जागेवर पेट्रोल ऑर्डर करू शकता. पेट्रोल पंप तुमच्यापर्यंत पेट्रोल पोहोचवेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत. चला याबद्दल जाणून घेऊयात –

इंडियन ऑइल कंपनी लोकांना ही सुविधा पुरवते. हायवेवर तुमच्या वाहनाचे डिझेल संपले तर तुम्ही इंडियन ऑइलच्या नंबरवर कॉल करून तुम्हाला डिझेल किंवा पेट्रोल मागवू शकता. तुम्हाला हवे त्या जागेवर पेट्रोल मिळेल.

अशा पद्धतीने करू शकता ऑर्डर

मोबाईल फोन काढा आणि Google वर fuel delivery at doorstep असं टाईप करा. यानंतर, इंडियन ऑइलची साइट ओपन होईल. तेथे असणारा कस्टमर केअर नंबर 1800 2090 247 डायल करा आणि पेट्रोल ऑर्डर करा.

अँप द्वारेही सुविधा

मोबाईलवर असणाऱ्या Fuel@Call अॅपच्या मदतीनेही तुम्ही इंधन मागवू शकता. यासाठी, Google Play Store किंवा App Store वरून Fuel@Call मोबाइल अॅप डाउनलोड करा. व्यवस्थित माहिती भरा. मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

व्हेरिफिकेशन झाले की तुमची नोंदणी कम्प्लेंट होईल. तुमचं जीपीएस लोकेशन ऑन करा. तुम्हाला हवे तेथे पेट्रोल पोहोच होईल. सध्या ही सेवा ठराविक शहरात सुरु आहे. लवकरच ही सेवा सर्वत्र सुरु होईल असे कंपनीने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe