अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तला या महिन्यात 8 ऑगस्टला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याचे समोर आले होते.
संजय दत्तने यानंतर स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तो उपचारांसाठी कामांमधून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होत. सध्या संजय दत्त कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे.
संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी न्यूयॉर्कला जाण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमधील त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत, जेथे त्याची आई नर्गिसवर कॅन्सरचा उपचार झाले होते.
संजय दत्तला उपचारांसाठी अमेरिकेत 5 वर्षांता व्हिसा मिळू शकतो. अमेरिकेतील मेमोरियल स्लोआन कॅटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत.
संंजय दत्तची आई नर्गिस 1980 ते 1981 दरम्यान याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. संजय दत्तला फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याने व्हिसासाठी अर्ज केला आहे.
मुंबई ब्लास्ट प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. संजय दत्तला व्हिसा मिळवण्यासाठी त्याची जवळच्या मित्राने मदत केली आहे. संजय दत्तसोबत त्याची पत्नी मान्यता बहीण प्रियापण सोबत जाण्याची शक्यता आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved