मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने लॉकडाऊन दरम्यान आपण काय धडा घेतला याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. शनिवारी शाहरुखने या लॉकडाउनच्या काळात जाणवलेल्या वास्तवादी पोस्ट शेअर केल्या.
यासह त्याने स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. या अभिनेत्याने फेसबुकवर लिहिले की, “लॉकडाउन लर्निंग .. की आपण आपल्या परिश्रमांपासून खूप दूर आहोत.
अनेक गोष्टी खरंच तितक्या महत्त्वाच्या नसतात जितके आपल्याला वाटत असते, वास्तविक पाहता अशा अनेक गोष्टी आहेत कि त्याशिवाय आपण राहू शकतो.
आपण आपली मागील आयुष्य आठवून थोडा विचार करा की आपण आपले आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक गोष्टींच्या मागे लागलो परंतु खरंच त्या गोष्टी गरजेच्या आहेत का? याचा विचार करणेही गरजेचे आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेम सोडून दुसरी कोणतीच गोष्ट उपयुक्त नाही . या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले की, ” ही फक्त शिकवण नाही तर हे अनुभव आहेत, आणि शाहरुख सर, तुम्ही फक्त त्या भावनांना शब्दांत बद्ध केले आहे.
मला आशा आहे हे लॉकडाउन तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरले असेल. आनंदी रहा आणि नेहमी हसत रहा.