अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-जमशेदपूर झारखंडच्या जमशेदपूर येथील हिना यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडली. आणि न्यायाधीश होण्याचं स्वप्न साकार केलं. हिना यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले.
हिना एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत त्यांनी न्यायाधीश होण्याच स्वप्न उराशी बाळगळ. अखेर तिनं नोकरी सोडली आणि न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली.
यूपी पीसीएस जे परीक्षेत प्रथमच उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. परंतु प्रीलिम्सला चांगले गुण मिळाले. त्यानंतर एका वर्षात यशस्वी होऊन यूपी पीसीएस जे 2019 परीक्षेत हीना न्यायाधीश झाल्या.
त्यांनी परीक्षेसाठी कशी तयारी केली ते जाणून घेऊयात. हिना म्हणतात, ज्या राज्यात परीक्षा देतो, त्या राज्याशी संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. सुरुवातीपासून अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आधी प्रिलिम्स आणि मग मेन्स असं न करता दोन्हीसाठी अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत, म्हणून सुरुवातीपासूनच कायदा वाचा. केस कायद्याकडेही लक्ष द्या.
परीक्षेची तयारी करताना एकाच सोर्सचा वापर करावा. जितका सोर्स तेवढं अधिक गुंतागुंतीचं होतं. चालू घडामोडीं अधिक चांगल्या लक्षात राहण्यासाठी व्हिडिओ पहाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com