अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :कोरोनाच्या प्रसाराबाबत भारतातील तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे.तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊनमुळे आतापर्यंत तरी देशात तितक्या प्रमाणात कोरोनाव्हायरस वाढल नाही मात्र लॉकडाऊन संपला तर तो इतक्या झपाट्याने वाढेल की, डिसेंबरपर्यंत अर्धा भारत कोरोनाच्या विळख्यात असेल.
न्यूरोव्हायरोलॉजी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सचे प्रमुख डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं की, आतापर्यंत देशात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली नाही.
31 मे रोजी लॉकडाऊन 4.0 संपल्यानंतर जूनपासून हा आकडा वाढेल. देशात कम्युनिटी ट्रान्समिशनही होईल. डिसेंबर अखेरपर्यंत भारतातील निम्मी लोकसंख्या कोरोनाने संक्रमित होईल.
90 टक्के लोकांना माहितीही नसेल की त्यांना कोरोना झाला आहे. फक्त 5-10 टक्के रुग्णांना हाय फ्लो ऑक्सिजनद्वारे उपचार करावे लागतील. फक्त 5 टक्के रुग्णांना वेंटिलेटरची गरज पडेल.
मार्च 2021पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागू शकते. लोकांनी कोरोनाव्हायरसह जगायला शिकायलं हवं. आवश्यक ती सर्व खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करायला हवा.
नवा कोरोनाव्हायरस हा एबोला, मर्स आणि सार्सप्रमाणे जीवघेणा नाही”, असंही डॉ. रवी म्हणालेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews