धक्कादायक ! कोरोनाने घेतला आता ‘ह्या’ मंत्र्याचा बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाने भारतात धुमाकूळ घातला आहे. बरीच बडी-बडी मंडळी कोरोनाने पछाडली आहे. कलाकार , नेते मंडळीही यापासून दूर राहू शकली नाहीत. अनेकांचे प्राणही कोरोनाने घेतले.

आता तामिळनाडूचे ७२ वर्षीय कृषिमंत्री आर. दोराईकन्नू याना देखील कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून त्यांचा शनिवारी रात्री येथील कावेरी रूग्णालयात मृत्यू झाला.

१३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या आईच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना दोराईकन्नू यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना विलुपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्याच दिवशी खबरदारी म्हणून दोराईकन्नू यांना कावेरी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. दोराईकन्नू यांच्या मृत्यूवर राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी दु:ख व्यक्त करताना शोकसंदेश दिला.

त्यात त्यांनी ‘दोराईकन्नू आपल्या साधेपणा, नम्रता, स्वच्छता, प्रशासकीय क्षमता आणि शेतकऱ्यांच्या भक्तीसाठी परिचित होते. त्यांच्या असे आकस्मित जाण्याने तामिळनाडू तसेच एआयएडीएमकेच्या लोकांचे न भरणारे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment