धक्कादायक ! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा भारतात शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतामध्ये प्रवेश केला आहे.

ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.

बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला आहे.

कोरोना विषाणूचा नवा अवतार पहिल्या विषाणूपेक्षा 70 टक्के जादा घातक आहे. या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे.

याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. ब्रिटनमध्ये काही महिन्यापूर्वी कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला होता.

या प्रकाराचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचे ब्रिटन सरकारने म्हटल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पण कोरोनाचा हा प्रकार 16 देशात पोहोचला आहे. भारतातही कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले असून, या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.