एका सीआरपीएफ जवानाने पत्नी आणि आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये शनिवारी हा प्रकार घडला.
विनोद कुमार यादव असे या सीआरपीएफ जवानचे नाव असून मुलाचे नाव संदीप आणि मुलीचे नाव सिमरन होते.
अधिक माहिती अशी की, विनोद कुमार यादव हे सीआरपीएफमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते.
ते आपली पत्नी विमल यादव मुलगी आणि मुलासह प्रयागराज येथे राहत होते. शनिवारी सकाळी विनोद यांनी आपल्या परवाना पिस्तूलने पत्नी,
मुलगी आणि मुलावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.