अहमदनगर Live24 टीम :- देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग आतापर्यंत 9 हजार 352 लोकांना झाला असून त्यापैकी 8048 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 324 रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.मात्र डोक्यावर अक्षता पडण्याआधीच नवरदेवाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं लग्नमंडपात मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि पंजाबमधील फरीदकोट इथल्या मुलीचा विवाह मोगा इथल्या तरुणासोबत होणार होता. राज्यात कर्फ्यू आणि लॉकडाऊन असतानाही हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता.
महिन्याभरापूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडतयानंतर 13 एप्रिलला लग्नाचा मुहूर्त ठरला. मात्र डोक्यावर अक्षता पडण्याआधीच नवरदेवाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली.
आरोग्य विभागानं नवरदेवाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मुलीकडच्या आणि मुलाकडील कुटुंबीयांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन कऱण्यात आलं आहे.
सर्वांच्या टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. मात्र तरीही या सर्वांना पोलीस आणि आरोग्य विभागानं होम क्वारंटाइन केलं आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®