अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील अभिनेता आशिष रॉय हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. ते आयसीयूमध्ये आहेत. त्याची तब्येत खूपच वाईट आहे. परंतु त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे समोर आले आहे.
सध्या देशात लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले आहे. चित्रपट आणि टीव्ही उद्योगही बंद आहे. शूटिंग होत नाही. अलीकडे टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल यांनीही आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली.
‘ससुराल सिमर का’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यासारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या आशिष रॉयचे मूत्रपिंड निकामी झाले आहे. त्याच्या शरीरात सुमारे 9 लिटर पाणी साचले होते.
कोरोनामुळे कोणतेही रुग्णालय दाखल करण्यास तयार नव्हते. परंतु बर्याच विनंतीनंतर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. आशिष म्हणाला की या वाईट काळात कोणीही माझ्याबरोबर नाही.
याआधीही आशिष खूप आजारी होता. सन 2019 मध्येही आशिष रॉय यांना अर्धांगवायू झाला होता. आशिष म्हणाले, “आतापर्यंत लाखो रुपये उपचारांवर खर्च झाले आहेत.
त्यांच्याकडे पैसे नाहीत. जर कोणी मदत करू शकेल तर मला कळवा अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com