अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांद्याची आयात करण्यात आली असून दिवाळीपूर्वी आणखी २५ हजार टन कांदा येणार आहे, असे ग्राहक व्यवहारमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले.
नाफेडही आयात सुरू करणार असल्याने बाजारपेठेत पुरेसा पुरवठा उपलब्ध होईल, केवळ कांदाच नव्हे तर १० लाख टन बटाटाही आयात करण्यात येत असून त्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंत सीमाशुल्क दहा टक्के करण्यात आले आहे, येत्या काही दिवसांमध्ये ३० हजार टन बटाटा भूतानमधून येणार आहे, असे गोयल यांनी सांगितले.
कांदा आयातीसाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तान, इजिप्त आणि तुर्कस्तानशी संपर्क केला आहे. वेगवेगळ्या देशांतून वेगवेगळ्या प्रमाणात मालाची आयात होणार आहे. दिवाळीआधी २५ हजार टन कांदा भारतात येईल. तसेच भूतानमधून लवकरच ३० हजार टन बटाटा भारतात येत आहेत.
कांदे आणि बटाटे यांची आवक वाढताच बाजारातील दर नियंत्रणात येतील, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. दिवाळसणाआधीच कांदे आणि बटाटे यांचे दर वेगाने वाढू लागले आहेत. पिकाच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये फरक असला
तरी अनेक ठिकाणी कांदा ८० रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्त दराने विकला जात आहे. तसेच बटाटा ६० रुपये किलो वा जास्त दराने विकला जात आहे. आयात मालाचा दर जास्त राहू नये यासाठी मर्यादीत काळासाठी आयातशुल्कात कपात करण्यात आली आहे. कांदा आणि बटाटा यांच्यावरील आयातशुल्क १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे.
बाजारात मालाची आवक वाढल्यावर कांदे आणि बटाटे यांचे दर नियंत्रणात येतील, असे केंद्र सरकार सांगत आहे. खासगी व्यापाऱ्यांनी ७ हजार टन कांदा आयात केला आहे. तसेच केंद्र सरकार आणि नाफेड परस्पर समन्वय राखून कांदा आणि बटाटा यांची आयात करत आहे. दिवाळीआधी २५ हजार टन कांदा भारतात येईल.
हा कांदा आल्यावर कांद्याचा दर नियंत्रणात येईल. आयात वेगाने करता यावी यासाठी मर्यादीत काळासाठी कांदा आणि बटाटा आयतीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांचा सकारात्मक लाभ लवकरच दिसेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.
कांदा, बटाटा आणि काही प्रकारच्या डाळींच्या किरकोळ दरात वाढ झाली होती. मात्र कांदा निर्यातीवरील बंदीसह सरकारने विविध उपाययोजना आखल्याने दर स्थिर राहिले आहेत, आता गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे दर प्रतिकिलो ६५ रुपये तर बटाटय़ाचे दर प्रतिकिलो ४३ रुपये असे स्थिर आहेत, असेही ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved