अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- सध्या दिल्ली ,पंजाब, हरियाणा तसेच भारत भर कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत व आंदोलन चालू आहे.
हे आंदोलन आता दिल्ली पर्यंत पोहोचले आहे व शेतकऱ्यांनी आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये देशातील विविध शेतकरी संघटना समाविष्ट झाल्या आहेत.
दिल्ली मधील शेतकऱ्यांना तसेच ते करत असलेल्या आंदोलनाला बदनाम करणाऱ्या तसेच कृषि सुधारणा कायदे दमदाटी ने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप पक्ष करत आहे.
या सगळ्या गोष्टी पाहून सर्वोच न्यायालायने सुनावणीत भाजपाला तसेच मोदी सरकारला खडसावले आहे. सर्वोच न्यायालय या सुनावणी मध्ये अत्यंत कठोर शब्दामध्ये मोदी सरकारवर बरसले आहे.
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ???? या सुनावणी मध्ये सर्वोच न्यायालायने कायद्याच्या अंबलबाजावणीवर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे.
न्यायालयाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कायद्याची अंबलबजावणी थांबवावी असा सर्वोच न्यायालयचा प्रस्ताव आहे. सरकार आता या विषयावर बाजू मांडू शकते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved