Surya Grahan 2023 : नवीन वर्ष सुरु होऊन जवळपास आता ३ महिने उलटत आली आहे. आता या नवीन वर्षातील म्हणजेच २०२३ मधील पहिले सूर्य ग्रहण पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. हे सूर्य ग्रहण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे तर काही राशीच्या लोकांना या ग्रहणात काळजी घ्यावी लागणार आहे.
पंचांगणानुसार २० एप्रिल २०२३ रोजी हे सूर्य ग्रहण सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होणार आहे. एकूण ग्रहण कालावधी 05 तास 24 मिनिटांचा असणार आहे. वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हे ग्रहण महत्वाचे मानले जाते.
२० एप्रिल २०२३ रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही. ते भारत सोडून इतर अनेक देशांमध्ये दिसणार आहे. ज्या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे त्या ठिकाणी सुतक कालावधी वैध मानला जातो. ज्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही अशा ठिकाणी सुतक कालावधी गृहीत धरला आत नाही.
2023 चे पहिले ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. हे सूर्य ग्रहण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे तर काहींसाठी अशुभ असणार आहे.
ज्योतिषशास्त्र काय सांगते
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे विशेष ग्रहण मानले जाते. त्यामुळे या ग्रहणाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव होतो तर काही राशीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे काही राशीच्या लोकांना काळजी घेण्याचाही सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे.
या राशींसाठी सूर्यग्रहण असणार शुभ
वृषभ, मिथुन आणि धनु
या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ ठरणार आहे. भाग्यदायक कल या राशीच्या लोकांसाठी या काळात चांगला आहे. वृषभ राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकेल, कर्ज फेडता येईल. नोकरीत चांगल्या ऑफर मिळण्याची चिन्हे आहेत, आर्थिक बाबतीत अनुकूल आणि सुखसोयींमध्ये वाढ.
पगारवाढ, नवीन नोकरी, पदात वाढ होईल. दुसरीकडे, मिथुन राशीच्या लोकांना काही मोठ्या प्रकरणात दिलासा मिळेल, त्यांना संततीचे सुख मिळेल. या सूर्यग्रहणामुळे धनु राशीच्या लोकांना संपत्ती मिळेल.
तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.आत्मविश्वास वाढण्यासोबतच नशीब तुमची साथ देईल, वैवाहिक जीवनात आनंदाचे संकेत आहेत. व्यवसायात नफा आणि नोकरीत प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
या राशींवर प्रभाव दिसून येईल
कन्या
या सूर्यग्रहणाचा प्रभाव हा कन्या राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. कन्या रास असणाऱ्या लोकांना या दिवशी समस्या निर्मण होऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांनी त्यांच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
तसेच या लोकांना मानसिक तणाव देखील असू शकतो. या दिवशी पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच प्रवासात देखील सावधगिरी बाळगावी. वादविवाद टाळणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
मेष
मेष राशीच्या लोकांना देखील पैशाबाबतीत सल्ला देण्यात आला आहे. या ग्रहणाच्या दिवशी पैशांची जास्त उधळपट्टी करणे टाळावे. जर तुम्ही पैसे खर्च करण्याबाबतीत नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते.
या दिवशी अशा लोकांना आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागेल. पण ग्रहण संपल्यानंतर गुरु मेष राशीत प्रवेश करणार असल्याने समस्या कमी होणार आहेत.
वृश्चिक
ग्रहणाच्या दिवशी या राशीच्या लोकांना विरोधक त्रास देऊ शकतात. तसेच पैशासंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. शारीरिक किंवा आरोग्यच्या समस्या देखील त्रास देण्याची शक्यता आहे. कामाची ठिकाणी देखील समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सिंह
सिह राशीच्या लोकांवर ग्रहणाच्या दिवशी नकारात्मक प्रभाव पडेल. ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव शिक्षण, रोजगार क्षेत्र, वेतनवाढ किंवा पदोन्नतीवर दिसून येईल. करिअरमध्ये अडचण येऊ शकतात.
सूर्यग्रहण 2023 वेळ
सूर्यग्रहण तारीख – 20 एप्रिल
सूर्यग्रहण सुरू होते – सकाळी 07:05 पासून
ग्रहणाचा खग्रास -08:07 वाजता असेल आणि सूर्यग्रहणाचा मध्यभाग सकाळी 09:45 पर्यंत असेल.
ग्रहण संपेल – दुपारी १२:२९ वाजता
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 05 तास 24 मिनिटे