सुशांत सिंह राजपूतच्या परिवारावरील संकटे कायम, आता झाले असे काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- सुशांत सिंह राजपूतच्या भावावर शनिवारी भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. तीन अज्ञात व्यक्तींनी सुशांतच्या भावावर गोळी झाडली आहे. गोळीबार करण्यात आलेल्या सुशांतच्या भावाचे नाव राजकुमार सिंह असं आहे.

राजकुमारसह त्याचा कर्मचारी अमीर हसनला देखील गोळी मारण्यात आली आहे. दोघांवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस त्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमांद्वारे अज्ञातांचा शोध घेत आहेत. अज्ञातांनी सुशांतच्या भावाला आणि त्याच्या कर्मचाऱ्याला गोळी का मारली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तीन अज्ञात दुचाकी स्वारांनी हे कृत्य केलं आहे.

राजकुमारचा मधेपुरा याठिकाणी बाईकचं शोरूम आहे. राजकुमार आणि त्याचा कर्मचारी घरातून शोरूमच्या मार्गाने जात असताना दोघांवर गोळीबार करण्यात आला. अशी माहिती राजकुमार सिंहने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe