देशातील कोरोनाबधितांची संख्या झाली इतकी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातील कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे.

देशभरातातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २५ हजार १५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचलेली आहे.

तसेच, सद्यस्थितीस देशात ३ लाख ८ हजार ७५१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ जण कोरोनामुक्त झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. दरम्यान, भारताचा कोरोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे. कोरोनाची तिसरी लाटही ओसरली असून ९५.४० टक्के रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण हे उपचाराधीन रुग्णांच्या ३० पटीने जास्त आहे. बाधित रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्ण यांच्यातील तफावत दिवसेंदिवस वाढत आहे, असे देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment