अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-बरेली : टिकटॉकवर व्हिडिओ बनविण्याच्या नादात एका युवकाचा गीव गेल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका गावात घडली.
हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुडिया भिकमपूर गावात लष्करी जवान वीरेंद्र कुमार हे राहतात. त्यांचा १८ वर्षीय मुलगा केशवने सोमवारी आपल्या आईकडे टिकटॉकवर व्हिडिओ बनविण्यासाठी कपाटात ठेवलेली रिव्हॉल्व्हर मागितली.
आईने सुरुवातीला त्याला नकार दिला; पण केशव अडून बसल्याने अखेर त्याला बंदूक देत त्याची आई घराबाहेर काम करण्यासाठी निघून गेली. यादरम्यान खोलीतून गोळीचा आवाज आल्याने सर्वांनी केशवच्या दिशेने धाव घेतली.
यावेळी कानाखाली गोळी लागून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या केशवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.