तिकीट एजंट बनला एअरलाइन किंग ! स्थापन केली विमान कंपनी पण, एक चूक झाली आणि सगळंच संपलं…

Ajay Patil
Published:

The fall of Jet Airways What happened : एकेकाळची भारताची आघाडीची एअरलाइन्स कंपनी जेट एअरवेज बुडाली असून बँकेच्या फसवणूक प्रकरणी या कंपनीचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांवर कारवाई केली असून या प्रकरणात 538 कोटी रुपयांची मालमत्ता देखील ईडीने जप्त केलेली आहे.

यासंबंधीचे आरोप पत्र 31 ऑक्टोबर रोजी ईडीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेले होते. प्रामुख्याने हे प्रकरण कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असून याप्रकरणी नरेश गोयल यांना ईडी कडून एक सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली

होते व ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहेत. नेमकी अशी कोणती कारणे घडली की जेट एअरवेज ग्राउंड झाली. त्याविषयीची माहिती या लेखात घेऊ.

पैशांचा गैरवापर केल्याचा बँकेने केला आहे आरोप

जेट एअरवेजच्या करण्यात आलेल्या फॉरेन्सीक ऑडिटमध्ये जेट एअरवेजने 1410.41 कोटी रुपये संबंधित कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा आरोप कॅनरा बँकेने केला होता व कंपनीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला.

तसेच गोयल कुटुंबाचा वैयक्तिक खर्च जसे की यामध्ये कर्मचारी पगार तसेच फोन बिल आणि वाहन खर्च इत्यादी जेट एअरवेजनेच केले होते. तसेच याशिवाय ईडीने जेट एअरवेज बुडण्या मागची काही कारणा देखील शोधून काढलेली आहेत. ती आपण बघू.

अशा पद्धतीने वळवला पैसा

1- पगाराचे व्यवस्थापनासाठी मॉस्किटो कॉइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून सल्ला घेतला.

2- रेल्वे इन्फ्रा कंपनीकडून आर्थिक सल्ला मसलत केली.

3- विमानाच्या स्पेअर पार्ट बाबत हिऱ्याच्या निर्यात दाराला सल्ला विचारण्यात आला.

4- अशा विविध पद्धतीने सेवा घेत त्याबद्दल पैसा देण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने एअरलाइन्सचा पैसा गोयल यांनी वळवला.

5- प्रवर्तकाशी संबंधित कंपन्यांना एजंट कमिशन म्हणून 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली.

अजून काही महत्त्वाची कारणे

गोयल यांनी जेट लाईट लिमिटेड ला ४०५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे जेआयएल अनुदान कर्ज देऊन निधी पळवून नेल्याचा आरोप आहे. परंतु यातील सर्वात मोठा भाग तिकीट विक्रीसाठी समायोजित केला.

तसेच एजन्सीने याबाबत दावा केला आहे की गोयल यांनी जीएसए म्हणजेच जनरल सेल्स एजंट ना अतार्किक आणि फुगवलेले कमिशन देऊन निधी पळवला. या निधीपैकी 50 टक्के निधी त्यांच्याच कंपन्यांकडे गेला.

एवढेच नाही तर जेआयएल चे काही व्यावसायिक आणि सल्लागारांची देखील आर्थिक व्यवहार होते. परंतु अशा व्यक्तींकडून कुठलाही सेवा प्रदान केल्याचा पुरावा नाही. म्हणजेच आला पैसा कुठे गेला अशा पद्धतीने हे सगळे प्रकरण दिसून येते.

जेट एअरवेजची सुरुवात नरेश गोयल यांनी कशी केली होती?

साधारणपणे 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला तिकीट एजंट व उद्योजक बनलेले नरेश गोयल यांनी जेट एअरवेज इंडिया लिमिटेड सुरू करू लोकांना एअर इंडिया चा पर्याय दिला होता. या कंपनीकडे 120 विमानांचा ताफा होता व ती देशातील आघाडीचे विमान कंपन्यांपैकी एक होती.

द जॉय ऑफ फ्लाइंग ही टॅगलाईन असलेली कंपनी जेव्हा यशाच्या शिखरावर होती तेव्हा दररोज 650 उड्डाणे चालवत होती.परंतु जेव्हा ही कंपनी आर्थिक संकटात सापडली व बंद झाली तेव्हा या कंपनीकडे फक्त सोळा विमाने उरली होती.

मार्च 2019 मध्ये या कंपनीचा तोटा तब्बल 5535.75 कोटी रुपयांवर पोहोचला होता.साधारणपणे 25 वर्ष यशस्वी चालवल्यानंतर जेट एअरवेज एप्रिल 2019 मध्ये मोठ्या कर्जाखाली होती व बंद झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe