अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-दाक्षिणात्य सुपरस्टार यश याचा बहुचर्चित चित्रपट KGF 2 च्या रीलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.
हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते या सिनेमाची वाट पाहत होते.
अखेरीस चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून आज सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित झाली आहे. सुपरस्टार यशच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
ज्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 13 कोटीहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा टीझर पाहिला आहे. 2018 मध्ये केजीएफ चित्रपट रीलीज झाला होता.
या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या दुसर्या भागात संजय दत्त मुख्य व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved