शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागलं, त्याला केंद्र सरकार जबाबदार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत.

यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. “गेल्या 61 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करतात. हे शेतकरी पंजाब, हरियाणाचे आहेत.

या शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. देश उपाशी असताना ज्या शेतकऱ्यांनी देशाला अन्न पुरवलं तेच हे शेतकरी आहेत.”

“या शेतकऱ्यांनी थंडी, वाऱ्यात दोन महिने आंदोलन करत आहेत. मात्र पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही. हा प्रजासत्ताक आहे का? जनतेची साधी विचारपूस केली जात नाही.

चर्चेने थकून जावं, त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. “शेतकरी आज वेगळ्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाऊ नये हा गांधींचा देश आहे.

खलिस्तानी म्हणणं गुंड म्हणणं या पातळीवर भाजप गेलेले आहे. 61 दिवसात त्यांची मानसिकता काय झाली असेल, ते बघायला हवं.

शांततेत आंदोलन सुरू असताना अडचणी निर्माण केल्या गेल्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागलं, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे,” असेही थोरात यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment