ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन कायदा मंजूर करणार आहे. आरोग्य मंत्रालयाने यासाठी आक्षेपार्ह जाहिराती कायदा १९५४ मध्ये दुरुस्तीचा मसुदा सादर केला आहे.
यात चमत्कारातून केले जाणारे उपचार, गाेरेपणा, उंची, लैंगिक क्षमता, मेंदूची क्षमता वाढवणे आणि वार्धक्य रोखण्याच्या जाहिराती दिल्यास ५ वर्षांची कैद व ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
एकूण ७८ आजारांना दूर करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात केली जाऊ नये, असे कायद्याच्या मसुद्यात म्हटले आहे.