देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु सर्व डॉक्टर्स वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे पुरवत आहेत. परंतु या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाही लागण होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.
दिल्लीच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त झाली आहे. आतापर्यंत 65 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
यापूर्वी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. शनिवारपर्यंत ही संख्या 29 होती, परंतु रविवारी 15 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 65 झाली आहे.
दिल्लीतील या बाबू जगजीवन राम रुग्णालयातील कर्मचार्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही यास दुजोरा दिला आहे.
या रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संसर्ग झालेल्या काही डॉक्टरांना व इतर कर्मचार्यांना एलएनजेपी हॉस्पिटल, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि काही खासगी रुग्णालयात दाखल केले गेले आहे.