अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- पॉर्न प्रॉडक्शन कंपनीचा उलगडा झाल्यानंतर आता यात नवनवे खुलासे होत आहेत. पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे बॉलीवूडमध्ये रुजली असून यातील एका अभिनेत्रीच्या व्यावसायिक पतीची कंपनी पॉर्न इंडस्ट्रीला पैसे पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरत, गुजरात येथून अटक केली आहे.
तन्वीर हाश्मी (४०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी शान बॅनर्जी ऊर्फ दीपांकर असे अटक करण्यात आलेल्या आठव्या संशयिताचे नाव होते. तो यापूर्वी अटक केलेल्या अभिनेत्री रोवा खान हिचा पती आहे. मालिका, वेब सीरिज तसेच चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणींचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या पॉर्न प्रॉडक्शन कंपनीच्या क्राईम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने गेल्या आठवड्यात पर्दाफाश केला होता.
पोलिसांनी मालाड (प.), मढ येथील एका बंगल्यातून यासिन बेग खान ऊर्फ रोवा, प्रतिभा नलावडे, मोनू जोशी, भानूसुराम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ या पाच जणांना अटक केली होती. यासिन बेग ही निर्माता दिग्दर्शक असून त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री गहना वसिष्ठ हिचे नाव पुढे आले होते. हे अश्लील व्हिडीओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर परदेशात विकणाऱ्या उमेश कामत यालाही अटक करण्यात आली.
तो बड्या अभिनेत्रीच्या पतीचा पीए म्हणून पूर्वी काम करत होता. मात्र ते काम गेल्यानंतर कामत याने झटपट पैसा कमावण्यासाठी पॉर्न इंडस्ट्रीचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांचे आर्थिक व्यवहार तसेच इतर पुराव्यांवरून आणखी संशयितांची नावे समोर येत आहेत.
पॉर्न प्रॉडक्शन कंपनीला अर्थपुरवठा बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या उद्योगपती असलेल्या पतीच्या कंपनीतून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिच्या पतीचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved