अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १४ ते २० सप्टेंबर दरम्यान विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत,
अशी माहिती भाजपचे नेते माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली. माजी आमदार पिचड पुढे म्हणाले कि, या सेवा सप्ताहमध्ये प्रत्येक मंडलात ७० दिव्यांगांन विविध वस्तू वाटप केल्या जाणार आहेत.
रुग्णांना फळे वाटप, कोरोनाबधितांना प्लाझ्मा दान करण्यात येणार आहे. युवा मोर्चाच्या वतीने ७० ठिकाणी रक्तदान शिबीर, प्रत्येक बुथवर ७० वृक्ष लागवड यासह पर्यावरण संरक्षण संकल्प, स्वच्छता अभियान होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांनी या सेवा काळात प्रयत्न करावा.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved