अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-लॉक डाऊनमध्ये हरियाणातील गुरुग्राममध्ये आपल्या वडिलांना सायकलवरुन घरी आणणाऱ्या ज्योतीच्या साहसाची सवर्त्र चर्चा झाली.
परंतु आता तिच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट काढण्यात येणार असल्याचे फिल्म निर्माता सह निर्देशक विनोद कापडी यांनी सांगितले. BFPL चे प्रवक्ता महेंद्र सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद जारी करीत ही माहिती दिली.
ज्योतीची कथा आव्हानात्मक आहे. ती एका मजुराची संघर्ष कथा आहे आणि प्रेरणादायी आहे. निर्माता विनोद कापडी यांनी सांगितले की, ही यात्रा अत्यंत आव्हानात्मक होती.
ज्यावर त्यांचा माहितीपट लवकरच येणार आहे. ज्योती आणि तिचे वडील मोहन पासवान यांच्यासह फोनवर बातचीत केली.
ज्योती आणि तिचे वडील यांच्या होकारानंतर चित्रपट आणि वेब सीरिज तयार करणारे भागीरथी फिल्म प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com