महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला, सात दिवसांत या हत्याकांडाचा पर्दाफाश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- मध्य प्रदेशातील सूसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीपासून पिच्छा सोडवण्यासाठी पतीनेच ५ लाख रुपयांची ‘सुपारी’ देऊन तिची हत्या घडवून आणली.

सुसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालडा गावाजवळ निर्जन ठिकाणी १४ जानेवारी रोजी पोलिसांना एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. तिचा गळा आवळून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आगर-मालवा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला.

महिलेचे पोस्टर सर्वत्र लावण्यात आले. गावागावात जाऊन चौकशी केली. त्याचवेळी मृत महिला पगारियाची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक पगारिया येथे पोहोचले. घरमालकाकडून त्यांनी सर्व माहिती घेतली. महिलेचा पती अर्जुन फौजी आणि अन्य काही जण आले होते.

त्यांनी दोन हजार रुपये महिला भाड्याने खोली घेऊन दिली होती. कामाक्षी असे या महिलेचे नाव होते. ती मूळची छिंदवाडा येथील रहिवासी होती, अशी माहिती मिळाली.

पतीनेच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या घडवून आणली. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या हत्येमागील सूत्रधार असलेल्या अर्जुन फौजी याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment