भारतात असे एक राज्य आहे जे जर्मनीएवढे आहे; थाटही असा की थेट जर्मनीचे पर्यटक येतात

Published on -

जर्मनी देश हा जगातील विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. जर्मनीने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. क्षेत्रफळाचा विचार केला तर जर्मनीचे क्षेत्रफळ 3,57,022 चौरस किलोमिटर आहे. भारतातले एक राज्यही तेवढेच आहे, हे तुम्हाला माहित आहे का? विशेष म्हणजे भारतातील या राज्याची जगभरातील लोकांना भुरळ पडलीय. जर्मनीचे नागरीकही तेथे पर्यटनासाठी येतात.

राजस्थानची रितच न्यारी

भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या राजस्थानचा राजेशाही इतिहास जगभर प्रसिद्ध आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ अंदाजे 3,42,239 चौरस किलोमीटर आहे. जर्मनीच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर, जर्मनीचे क्षेत्रफळही 357,022 चौरस किलोमीटर आहे. राजांची भूमी अशीही राजस्थानची ओळख आहे. महाराणा प्रताप, राणा सांगा, पृथ्वीराज चौहान यांसारख्या महान योद्ध्यांची नावे राजस्थानच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरली गेली आहेत. आपल्या धैर्याने त्यागाने आणि देशभक्तीने त्यांनी केवळ राजस्थानलाच नव्हे तर संपूर्ण भारताला गौरव मिळवून दिला.

पर्यटकांची होते गर्दी

राजस्थानला गड किल्ल्यांचाही इतिहास आहे. आजमेर किल्ला, मेहरानगड किल्ला, चित्तौडगड आणि उदयपूरचा सिटी पॅलेस आजही त्याच्या शाही वारशाची साक्ष देतात. कठपुतळी कला आणि दाल-बाटी-चुरमा सारख्या पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी देखील राजस्थानमध्ये रेलचेल आहे. राजस्थान हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि बिकानेर ही शहरे परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. वाळवंट सफारी आणि किल्ल्यांना भेटी देणे लोकांच्या सहली संस्मरणीय बनवते.

राजस्थानची जगभर चर्चा

राजस्थानचा इतिहास गौरवशाली आहे. त्यामुळेच येथे देशविदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी येतात. जर्मनीशी क्षेत्रफळाच्या बाबतीत स्पर्धा करणारे भारतातील हे राज्य भारत सरकारच्या विविध प्रोजेक्टनेही चर्चेत राहिले आहे. पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा पाहता येथील पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News