आपण बरेचदा असे ऐकले असेलच की प्रेमाला वय नसते. लक्ष्मी अम्माल आणि कोचियानची कथा ही ताजी उदाहरण आहे.
ज्या वयात लोक निवृत्त होतात त्या वयात या दोघांचे लग्न होणार आहे. 65 वर्षीय लक्ष्मी आणि 66 वर्षीय कोचियान अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांची भेट वृद्धाश्रमात झाली होती.
लक्ष्मीचे पती आणि कोचीन एकेकाळी चांगले मित्र होते. सुमारे 21 वर्षांपूर्वी तो आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेत होता.
त्यानंतर कोचीनने मित्राला वचन दिले की तो आपल्या पत्नीची काळजी घेईल. कोचियानने आपल्या मित्राला दिलेल हे आश्वासन पूर्ण केल.
गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक परिस्थितीत कोचियान नेहमी लक्ष्मीच्या मदतीला उभे राहिले. या प्रवासात दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्यांना समजलेच नाही.
आता त्यांना एकमेकावरील प्रेम समजले,आणि म्हणूनच त्यांनी एकत्र यायचे ठरवले, येत्या 31 डिसेंबर रोजी लक्ष्मी आणि कोचियान लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
विशेष म्हणजे हे लग्न लक्ष्मी आणि कोचियान ज्या वृद्धाश्रमात राहतात त्याचे प्रमुख व्ही जी जयकुमार यांनी वृद्धाश्रमात आयोजित केल आहे. लक्ष्मी आणि कोचियान त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुक आहेत.
नव्या वर्षात त्यांच्या नव्या आयुष्यास ते सुरवात करणार आहेत