स्टेट बँकेत पैशांची देव-घेव, ड्राफ्ट भरणे आदी गोष्टी होतील घरबसल्या पूर्ण ; वाचा एसबीआयची ‘ही’ सर्व्हिस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये जर तुमचे खाते असेल तर आता तुम्हाला बँकेच्या वतीने रोख रक्कम काढण्याची आणि जमा करण्याची सुविधा घरबसल्या मिळेल.

बँक द्वारा डोर स्टेप बँकिंग सुविधा पुरविली जात आहे. या सुविधेअंतर्गत तुम्हाला बँकिंग संबंधित कामांसाठी बँकेत जावे लागणार नाही. आम्ही आपल्याला या सेवेशी संबंधित महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

कोण घेऊ शकेल याचा फायदा ? :- 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती (दृष्टिहीन) व अपंग व्यक्ती (वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित दीर्घ आजार किंवा अपंग व्यक्ती) ही सुविधा घेऊ शकतात.

याशिवाय आपले केवायसी पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. या सेवांसाठी खातेधारकास होम ब्रांचपासून 5 किमीच्या परिघात रजिस्टर्ड मोबाइल नंबरसह उपस्थित रहावे लागेल.

कोणत्या बँकिंग सुविधा उपलब्ध असतील? :- या सुविधांमध्ये रोख देव-घेव, धनादेश देणे, ड्राफ्ट वितरण करणे, फॉर्म 15 एच घेणे, जीवन प्रमाणपत्र घेणे आणि केवायसीची कागदपत्रे घेणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. या सुविधेचा लाभ सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत 1800111103 क्रमांकावर फोन करून घेता येईल.

किती द्यावा लागेल चार्ज? :- गैर-आर्थिक व्यवहारासाठी 60 रुपये आणि जीएसटी प्रति विजिट शुल्क द्यावे लागेल. आर्थिक व्यवहारासाठी 100 रुपये व जीएसटी प्रति विजिट शुल्क द्यावे लागेल. रोख रक्कम काढण्यासाठी आणि रोख ठेवींसाठी प्रत्येक व्यवहारासाठी 20 हजार रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

यासाठी नोंदणी कशी केली जाईल? :- या सुविधेसाठी तुम्हाला तुमच्या गृह शाखेत जाऊन नोंदणी करावी लागेल. संयुक्त खाती, वैयक्तिक नसलेली आणि नाबालिग खाती असणारी लोक ही सुविधा घेऊ शकणार नाहीत. पैसे काढणे केवळ चेक किंवा पासबुकद्वारे केले जाऊ शकते.

या बँकाही डोर स्टेप सर्व्हिस देत आहेत :- एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक बँक देखील आपल्या ग्राहकांना डोअर स्टेप बँकिंग सेवा देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment