भारतातील ‘ही’ ठिकाणे देतील तुम्हाला शांत जीवनाचा आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव! ही आहेत भारतातील निसर्गाने परिपूर्ण अशी पर्यटन स्थळे

Tourist Place In India:- भारतातील प्रत्येक राज्यामध्ये अनेक निसर्गाने समृद्ध असलेली पर्यटन स्थळे आपल्याला बघायला मिळतात व त्यामुळे अशा ठिकाणांवर प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी आपल्याला दिसून येते. दररोजच्या त्याच त्याच धकाधकीच्या जीवनशैलीला कंटाळून आणि या दररोजच्या त्याच त्याच रुटीन मधून काही वेळ आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आणि शांततेत घालवता यावा याकरिता बरेच जण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लान बनवतात.

अशाप्रकारे एक ते दोन दिवसाची ट्रीप प्लान करणे हे स्वतःला फ्रेश करण्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे असते. भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु कायम अशा ठिकाणी आपल्याला गर्दी असल्याचे दिसून येते.

परंतु तुम्हाला जर कमी गर्दी असलेल्या आणि निसर्गाने परिपूर्ण असलेल्या ठिकाणी जायचे असेल तर या लेखामध्ये अशाच काही ऑफबिट ठिकाणांची माहिती दिली आहे ज्या ठिकाणी तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकतात.

ही आहेत भारतातील शांत आणि निसर्गाने परिपूर्ण अशी पर्यटन स्थळे

1- कसोल- हे ठिकाण हिमाचल प्रदेश मध्ये असून शिमला आणि मनालीच्या गर्दी पासून हे ठिकाण दूर आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची सेलिब्रेशन करायचे असेल तर कसोल हे ठिकाण खूप फायद्याचे ठरते. तसेच फिरण्याच्या दृष्टिकोनातून देखील कसोल फार सुंदर असे ठिकाण आहे.

या ठिकाणी असलेले बर्फाने झाकलेले उंचच उंच पर्वत तसेच दाट जंगले, सुंदर असे तलाव आणि धबधबे मनाला मोहून टाकतात. कसोलला भारताची मिनी इस्राइल असे देखील म्हणतात.

कारण या ठिकाणी तुम्हाला रुचकर आणि स्वादिष्ट असे इस्रायली पदार्थ खाता येतात व पार्टी जर करायची असेल तर एक रूम बुक करून तुम्ही आरामात पार्टी देखील करू शकतात.

2- बिनसर- उत्तराखंड राज्यात असलेले बिनसर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2000 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. या ठिकाणी असलेली शांतता खूप महत्त्वाची असून या ठिकाणी तुम्ही कुटी तसेच होम स्टे

किंवा कॅम्पमध्ये रूम बुक करून छानशी कुटुंब किंवा मित्रांसोबत पार्टी देखील करू शकतात व या ठिकाणी तुम्ही बिनेश्वर मंदिर, झिरो पॉईंट आणि जलना अशा अद्भुत ठिकाणांची सफर करून अद्भुत पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.

3- पेलिंग- दार्जिलिंग किंवा गंगटोक ऐवजी तुम्ही पेलिंग या सिक्कीम राज्यातील सुंदर अशा हिल स्टेशनला भेट देऊ शकतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याचे आपल्याला दिसून येते.

नवीन वर्षाच्या पार्टी किंवा इतर पार्ट्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणच्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट खूप फायद्याचे आहेत. या ठिकाणी असलेल्या रिसॉर्ट अँड हॉटेलमध्ये तुम्ही अविस्मरणीय अशी मित्रांसोबत पार्टी करू शकतात व निसर्गाचा अनुभव देखील घेऊ शकता.हे एक सुंदर हिल स्टेशन आहे.

4- गणपतीपुळे- गणपतीपुळे हे नाव प्रत्येकाने ऐकलेले असेल व हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि गर्दीच्या ठिकाणापासून दूर असलेले पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळ्याचे विशेष म्हणजे हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असून या ठिकाणी सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्ग सौंदर्य नक्कीच मनाला भुरळ घालते.

या ठिकाणी 400 वर्षे जुने गणेश मंदिर असून या मंदिराला देखील तुम्ही भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेऊ शकतात.एखाद्या खास प्रसंगाच्या सेलिब्रेशन करिता गणपतीपुळे हे ठिकाण खूप फायद्याचे आहे.

5- अगुंबे- कर्नाटक राज्यामध्ये अगुंबे हे पर्यटन स्थळ असून याला दक्षिणेची चेरापुंजी म्हणून देखील ओळखले जाते व हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

अगुंबे हे साहसी पर्यटकांसाठी खूप लोकप्रिय आहे व ठिकाणाचे निसर्ग सौंदर्य देखील अप्रतिम आहे. तुम्ही जर या ठिकाणी गेला तर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अनोखा नजारा या ठिकाणाहून पाहू शकता. या ठिकाणी बारकना धबधबा आहे व ज्याला देशातील दहावा सर्वात उंच धबधबा मानला जातो.