‘ह्या’ लोकांना बँकांमध्ये नाही उघडता येणार करंट अकाउंट; ‘हे’आहेत नवे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार करंट अकाउंटसंदर्भात काही निर्देश देण्यात आले आहेत.

यामध्ये असे सांगितले आहे की, ज्या ग्राहकांच्या खात्यांवर आधीच रोख रक्कम किंवा ओव्हरड्राप्टच्या माध्यमातून क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे, त्या ग्राहकांचे चालू खाते (करंट अकाउंट) उघडण्यात येऊ नये.

या निर्णयामुळे विविध बँकांमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर पाबंदी आणली जाऊ शकते असे अभ्यासकांचे मत आहे.

काय आहे चालू खाते (करंट अकाउंट)? व्यवसाय करणाऱ्यांसाठी चालू खाते असते. चालू खात्यामध्ये असणारे पैसे कोणत्याही वेळी बँकेची शाखा किंवा एटीएममधून काढता येतात. खातेधारक कितीही वेळा पैसे काढू शकतात. व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार चालू खात्यातील पैसा वरखाली होत असतो. बँका या पैशांचा वापर करत नाहीत. चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही.

 काय आहे आरबीआयचा आदेश? आरबीआयच्या नवीन आदेशांनुसार ज्या ग्राहकांच्या खात्यांवर आधीच रोख रक्कम किंवा ओव्हरड्राप्टच्या माध्यमातून क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे, त्या ग्राहकांचे चालू खाते (करंट अकाउंट) बँक उघडणार नाही. नवीन गाइडलाइननुसार सर्व व्यवहार कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खात्याच्या माध्यमातून करण्यात येतील. आरबीआयच्या गाइडलाइननुसार बँक सर्व चालू खाती, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा असणारी खाती नियमित स्वरूपात मॉनिटर करतील.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment