Tourist Place In India: प्रमुख 4 धामपैकी द्वारका आहे प्रमुख धाम! सुप्रसिद्ध द्वारकेच्या सभोवतालचे समुद्रकिनारे पाहाल तर गोवा पडेल फिका

Tourist Place In India:- पर्यटन स्थळांच्या दृष्टीने भारत हा एक समृद्ध देश असून प्रत्येक राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये सुंदर असे हिल स्टेशन पासून ते विविध गड किल्ले तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या स्थळांचा देखील यामध्ये आपल्याला समावेश करता येईल.

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमे पासून ते पूर्वेपर्यंत असलेल्या सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे आहेत. जर आपण महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरात राज्याचा विचार केला तर या राज्यामध्ये अनेक सुप्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे असून अनेक तीर्थक्षेत्र देखील आहेत.

त्यातील जर आपण चारधाम पैकी प्रमुख असलेल्या द्वारका या शहराचा विचार केला तर हे भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित असलेले स्थळ आहे. द्वारका हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असून या ठिकाणचे मंदिरे तर प्रसिद्ध आहेतच परंतु शेजारी असलेले समुद्रकिनारे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

तुम्हाला देखील द्वारकेला फिरायला जायचा प्लॅन असेल तर या शहराच्या जवळ असलेले काही सुंदर समुद्रकिनारे खूप प्रसिद्ध असून ते पाहिल्यावर तुम्हाला गोवा त्यांच्यासमोर फिके वाटायला लागेल.

 द्वारका शहराच्या आसपास असलेले प्रमुख समुद्रकिनारे

1- मांडवी कच्छ बीच द्वारका शहराच्या जवळ असलेले हे मांडवी बीच परिसरातील सर्वात लोकप्रिय बीच म्हणून ओळखले जाते. या बीचला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. मांडवी कच्छ बीचला मध्ययुगीन काळामध्ये एक शिपिंग पोर्ट म्हणून ओळखले जात होते.

मांडवी कच्छ बीचवर हम दिल दे चुके सनम आणि लगान सारख्या प्रसिद्ध चित्रपटांची शूटिंग देखील करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते कारण या ठिकाणचा सूर्यादय आणि सूर्यास्त पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

2- द्वारका बीच द्वारका बीच हे द्वारका शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असून पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. द्वारकेच्या समुद्रकिनाऱ्यावरून तुम्ही अरबी समुद्राचे सुंदर लाटांचे विहंगम दृश्य पाहू शकतात. द्वारका बीचचे  निळेशार पाणी आणि पांढरी रेती या समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर टाकते.

3- शिवराजपुर बीच द्वारका शहरापासून हे बीच 11 किलोमीटर अंतरावर असून हा समुद्रकिनारा त्या ठिकाणचे सौंदर्य आणि तेथील स्वच्छतेमुळे या समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग बीच असा दर्जा दिला गेला आहे. हा समुद्रकिनारा या ठिकाणच्या वॉटर स्पोर्ट साठी खूप प्रसिद्ध असून या समुद्रकिनाऱ्याला देश-विदेशातील असंख्य पर्यटक दर वर्षी भेट देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe