Wedding Destination In MP: निसर्गरम्य ठिकाणी लग्न व्हावे अशी आहे का? ‘ही’ आहेत मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध डेस्टिनेशन वेडिंग

Published on -

Wedding Destination In MP:- सध्याच्या तरुणाईमध्ये अनेक बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते व या पद्धतीची क्रेझ ही लग्नाच्या बाबतीत  देखील आपल्याला दिसून येते. सध्या आपल्याला माहिती आहे की लग्न म्हटले म्हणजे आजकालच्या तरुणांचे अनेक मोठे मोठे स्वप्न असतात.

लग्नामध्ये सजावट असो की  वाजंत्रीपासून तर वेडिंग कार्ड पर्यंत सगळ्या पद्धतीच्या प्लॅनिंग मनामध्ये असतात. तसेच प्री-वेडिंग फोटोशूटची देखील मोठ्या प्रमाणावर क्रेझ आताच्या तरुणांमध्ये दिसून येते. तसेच अनेकांचे स्वप्न असते की लग्न हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी व्हावे.

त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर भारतामध्ये असे डेस्टिनेशन वेडिंग  म्हणून अनेक ठिकाणी आहेत. यातील काही ठिकाणांची निवड जोडप्यांकडून केली जाते.

याचा अनुषंगाने या लेखामध्ये आपण मध्यप्रदेशातील काही डेस्टिनेशन वेडिंगसाठी महत्त्वाची अशी काही सुंदर ठिकाणांबद्दल आणि हिल स्टेशनबद्दल माहिती घेणार आहोत.

 मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध डेस्टिनेशन वेडिंग

1- मांडू हिल स्टेशन- मध्यप्रदेश राज्यातील मांडू हे एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक तसेच ऐतिहासिक हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण टेकडीवर वसलेले असून मध्य प्रदेशातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.

मांडू हे ठिकाण स्थापत्य कलेसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. मांडू हिल स्टेशन डेस्टिनेशन वेडिंगकरिता उत्तम ठिकाण देखील ओळखले जाते. या ठिकाणी असलेला राधिका गार्डन, उत्सव मॅरेज गार्डन आणि जहाज महल ही काही वेडिंग व्हेन्यू आहेत.

2- पंचमढी हिल स्टेशन- पंचमढी हिल स्टेशन संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे व हे मध्य प्रदेश राज्यात येते. या ठिकाणी देशाच्या आणि विदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यामुळे वेडिंग डेस्टिनेशनसाठी हे ठिकाण देखील खूप महत्त्वाचे आहे.

या ठिकाणी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि रिसॉर्ट  उपलब्ध असून या ठिकाणाची निवड तुम्ही वेडिंग डेस्टिनेशन साठी करू शकतात. या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग तसेच द समर हाऊस आणि एमपीटी चंपक बंगला ही काही वेडिंग व्हेनु आहेत.

3- ओंकारेश्वर हिल स्टेशन नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर वसलेले हे एक पवित्र ठिकाण असून प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. हे ठिकाण देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य मानले जाते. या ठिकाणी असलेले वेडिंग वेन्यूचा विचार केला तर हॉटेल उज्वल पॅलेस आणि हॉटेल बृजवासी खूप महत्त्वाचे आहेत.

4- शिवपुरी- समुद्रसपाटीपासून सुमारे 400 मीटर उंचीवर वसलेले हे मध्य प्रदेश राज्यातील सर्वात शांत असलेले हील स्टेशन म्हणून ओळखले जाते.

शिवपुरी हिल हे देखील एक डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य ठिकाण आहे. या ठिकाणचे काही प्रसिद्ध वेडिंग वेन्यू पाहिले तर यामध्ये राम राजा विवाह घर, स्काय लाईन रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट, शगुन वाटिका आणि साक्षी मॅरेज गार्डन यांचा समावेश होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!