मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
tourist place

मे महिन्याला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील बऱ्याच भागांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे व पारा अनेक ठिकाणी 40 अंशाचा पार आहे. त्यामुळे या कालावधीत अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे सर्वजण त्रस्त झाल्याचे चित्र आहे.

त्यातल्या त्यात आता शाळांना देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळे बरेचजण या वाढत्या उष्णतेपासून थोडासा आराम मिळावा याकरिता काही हिल स्टेशन तसेच थंड हवेच्या ठिकाणांना फिरायला जाण्यासाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत ट्रीप प्लान करतात.

महाराष्ट्रात आणि एकंदरीत भारतात पाहिले तर अशी अनेक हिल स्टेशन आणि थंड हवेचे ठिकाणे आहेत. परंतु त्यातल्या त्यात जर तुम्हाला परवडणाऱ्या खर्चामध्ये वाढत्या उष्णतेपासून काही कालावधी करिता स्वतःला वेगळे करता येईल व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा द्विगुणीत करता येईल अशा उपयोगी काही ठिकाणांची माहिती या लेखात बघणार आहोत.

 मे महिन्यात ट्रीप प्लान करायचे असेल तर या ठिकाणी द्या भेट

1- चेरापुंजी चेरापुंजी हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये असून ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम असे हिल स्टेशन असून या ठिकाणी देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. फिरण्यासाठी एकदम उत्तम असे हे ठिकाण असून या ठिकाणचा निसर्ग पाहून मनाला खूप आनंद मिळतो.

तसेच या ठिकाणी असलेले उंच पर्वत, अनेक गुहा, धबधबे आणि काही प्रेक्षणीय स्थळे देखील पाहण्यासारखे आहे. मे महिन्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी ट्रीप प्लान केली तर हिवाळ्याच्या थंडीचा गारेगार अनुभव तुम्ही घेऊ शकतात.

2- दार्जिलिंग हे ठिकाण पश्चिम बंगाल राज्यात असून देशातील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. दार्जिलिंगच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले चहाची मळे हे होय.

दार्जिलिंगला  गेल्यावर तुम्ही येथे चहाची मळे, दऱ्याखोऱ्यांचा असलेला प्रदेश, अनेक प्रकारची प्रेक्षणीय स्थळे आणि दार्जिलिंग येथील रेल्वे सगळं काही पाहण्यासारखे आहे. तुम्हाला जर गर्दी पासून कुठे दूर शांत ठिकाणी फिरायला जायचं असेल तर दार्जिलिंग हे ठिकाण उत्तम आहे.

3- तवांग तवांग हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये असून अतिशय शांत आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर तवांग हे ठिकाण उत्तम आहे. हे ठिकाण साधारणपणे समुद्रसपाटीपासून दहा हजार मीटरवर वसलेले शहर असून या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य आणि पर्वतराजी यामुळे  खूप सुंदर दृश्य बघायला मिळतात.

तसेच या ठिकाणी असलेले दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश, झरे तसेच नद्या, तवांग मठ आणि नूरनांग  धबधब्याला तुम्ही भेट देऊ शकता. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये अल्हाददायक वातावरण अनुभवायचे असेल तर तवांग हे ठिकाण तुमच्यासाठी फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe