‘ही’ मोबाइल कंपनी भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली: मोबाइल डिव्हाइस निर्माता कंपनी लावा इंटरनॅशनलने शुक्रवारी जाहीर केले की, ते आपला व्यवसाय चीनमधून भारतात आणणार आहेत.

भारतात नुकत्याच झालेल्या धोरणात्मक बदलामुळे कंपनीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल फोनच्या विकास आणि निर्मितीच्या कामात वाढ करण्यासाठी कंपनीने येत्या पाच वर्षात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय म्हणाले की, चीनमध्ये उत्पादन डिझाइनच्या क्षेत्रात किमान 600 ते 650 कर्मचारी आहेत.

आम्ही आता डिझाइनचे काम भारतात हलवले आहे. ते म्हणाले, “आम्ही चीनमधील आमच्या कारखान्यातून काही मोबाइल फोन जगात निर्यात करत आहोत, हे आता भारतातून केले जाईल.

” लॉकडाऊन कालावधीत लावाने चीनकडून आपली निर्यात मागणी पूर्ण केली. राय म्हणाले, “माझे स्वप्न चीनमध्ये मोबाइल डिव्हाइस निर्यात करण्याचे आहे.

भारतीय कंपन्या चीनमध्ये आधीच मोबाइल चार्जरची निर्यात करीत आहेत. उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेमुळे आपली परिस्थिती सुधारेल अशी कंपनीला आशा असून त्यामुळे आता संपूर्ण व्यवसाय भारतातूनच होईल. असे त्यांनी जाहीर केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment