अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- अनेक लोक असे आहेत कि ज्यांना नोकरीचा कंटाळा आलेला असतो. बऱ्याच लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची आवड असते. परंतु काय करावे याची नेमकी गाईडलाईन मिळत नाही.
जर तुम्हाला शेती असेल तर तुम्ही शेती संदर्भात काही व्यवसाय करू शकता आणि त्यातून लाखोंची कमाई करू शकता. चला जाणून घेऊयात सविस्तर…
१) सेंद्रिय शेती आणि उत्पादनांचे स्टोरेज :- रसायने आणि खतांनी जे आरोग्यासाठी हानिकारक परिणाम होत असतात ते सर्वाना आता माहित झाल्याने सध्या सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेल्या गोष्टींसाठी मागणी वाढत आहे. आपण सेंद्रिय पद्धतीने खाद्यपदार्थांचे उत्पादन करुन स्वत: चे सेंद्रीय फार्म ग्रीनहाऊस सुरू केल्यास आपल्याला याचा मोठा फायदा होईल. याशिवाय तुम्ही सेंद्रीय फूड स्टोर उद्योग देखील सुरू करू शकता.
२) फुलांचा व्यवसाय :- फुलांचे उत्पादन खूप लवकर होत असते. लोग लग्न किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात सजावटीसाठी विविध प्रकारच्या फुलांचा उपयोग करतात. त्यामुळे फुलांची बाजारात नेहमीच मागणी असते.
३) शास्त्रोक्त कुक्कुटपालन :- लोक कोंबडीचे मांस आणि अंड्यांचे कोणत्याही काळात सेवन करत असल्याने याची मागणी सतत सुरू असते. त्यामुळे पशूपालन संबंधित व्यवसाय सुरू करून पैसे कमविण्याची चांगली संधी आहे. मत्स्य व्यवसाय देखील अत्यंत फायदेशीर आहे, केंद्र सरकारही यात मच्छीमारांना मदत करत आहे.
४) सूर्यफूलाची शेती :- शेतकऱ्यांना याद्वारे चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र यासाठी अधिक जमिनीची आवश्यकता असते. याला कमर्शियल कॅश क्रॉप म्हटले जाते. मात्र या व्यवसायाला सुरू करण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
५) मशरूम उत्पादन :- शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होते. मशरुमचे उत्पादन जर आपण सुरु केले तर निश्चितच आपण चांगली कमाई करू शकता. त्यामुळे शेतकऱ्यासाठी मशरुम उत्पादन हा नवीन जोडधंदा बनू शकतो.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved