Tourist Destination: स्वस्तात मस्त ट्रीप प्लान करायची आहे का? ‘या’ ठिकाणी फिरायला 10 हजार ठरतील पुरेसे

Published on -

Tourist Destination:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुटुंबासमवेत किंवा मित्रांच्या सोबत फिरायला जायची इच्छा असते व त्या पद्धतीने टूर प्लान देखील केले जातात. परंतु अशा पद्धतीने टूर प्लान करताना आपला आर्थिक बजेट प्रत्येक जण पाहत असतो. आपल्या खिशाला परवडेल व आपल्याला जे अपेक्षित आहे ते देखील पाहणे होईल या पद्धतीने ट्रीपची प्लॅनिंग केली जाते.

परंतु असे स्वस्त पर्यटन स्थळे शोधताना मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. कारण भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे असून यामधील कोणती पर्यटन स्थळे आपल्याला परवडू शकतील हे मात्र ठरवताना दमछाक होते. तसेच हल्लीच्या तरुणाईमध्ये  हनिमून ट्रीपला जाण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून या दृष्टिकोनातून देखील अनेक जण कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या ठिकाणांचा शोध घेत असतात.

म्हणजेच फिरणे देखील होईल व आपला बजेट देखील बिघडणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न सगळेजण करत असतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण भारतातील काही महत्त्वाची डेस्टिनेशन बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही स्वस्तात ट्रिप आयोजित करू शकतात.

 या ठिकाणी स्वस्तात करा ट्रिप प्लान

1- जयपुर जयपुर हे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असून राजस्थान राज्यात आहे. या ठिकाणी जर तुम्हाला कुटुंबासमवेत किंवा तुमच्या जोडीदारासोबत जायचे असेल तर अगदी दहा हजार रुपयांमध्ये तुमची ट्रिप  आरामात होऊ शकते. या ठिकाणी जाण्यासाठी अनेक वाहने सहजपणे उपलब्ध होतात. जर आपण भाड्याचा दर जर पाहिला तर 300 ते 400 रुपयांमध्ये तुम्ही अनेक वाहनांचा वापर करू शकतात. तुम्हाला जर स्कुटी वरून जयपुर शहर फिरायची इच्छा असेल तर तुम्ही ती देखील पूर्ण करू शकतात.

Jaipur: Pink City Jaipur named World Heritage site by UNESCO; PM Modi thrilled - The Economic Times

2- माउंट अबू माउंट अबूला जर तुम्हाला जायचे असेल तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रवास करण्याचा खर्च व या ठिकाणी तुम्हाला राहायचं असेल तर याचा खर्च खूप कमी येतो. जर आपण हॉटेलिंगचा खर्च पाहिला तर अगदी हजार ते पंधराशे रुपयेमध्ये तुम्हाला हॉटेल राहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होतात.

माउंट अबूमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला एका दिवसासाठी पाचशे रुपये भाड्याने स्कूटर देखील मिळते. तसेच ज्या ठिकाणाहून तुम्हाला प्रवास करायचा असेल तो ट्रेननेच करावा लागतो व स्लीपर कोचमध्ये पाचशे रुपये पर्यंत तुम्हाला तिकीट उपलब्ध होते.

म्हणजेच दोन लोकांचा प्रवास खर्च फक्त दोन हजार रुपये इतका येतो. समजा तुम्हाला माउंट अबुला जर दोन दिवस थांबायचे असेल तर तुम्हाला दोन दिवस राहण्याचा खर्च 2500 पर्यंत येतो. या पद्धतीने माउंट अबू तुम्ही तुम्ही कमीत कमी  खर्चात फिरू शकतात.

Mount Abu Tourist Places to Visit, Tour Packages, Sightseeing and Attractions - Rajasthan Tourism

3- किशनगड कमीत कमी बजेटमध्ये जर तुम्हाला सुंदर अशा ठिकाणी जायचे असेल तर राजस्थान राज्यातील किशनगड हे ठिकाण खूप उत्तम ठरू शकते. जर तुम्ही किशनगडला गेला तर तुम्हाला एका ट्रिपमध्ये दोन चांगल्या ठिकाणांना भेट देता येणे शक्य आहे. किशनगडच्या एक तासाच्या अंतरावर पुष्कर हे ठिकाण असून पुष्करला तुम्हाला पांढऱ्या संगमरवरीने बनवलेल्या डंपिंग यार्डला भेट देता येऊ शकते.

विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क किंवा फीस लागत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अगदी 1000 रुपयांमध्ये तुम्हाला या ठिकाणी राहायला हॉटेल मिळतात. तुम्हाला जर स्कुटी वरून किशनगड फिरायचे असेल तर पाचशे ते सहाशे रुपये मध्ये तुम्हाला भाड्याने स्कूटर देखील या ठिकाणी उपलब्ध होते.

Kishangarh: An incredible hidden gem in Rajasthan | Times of India Travel

 अशा पद्धतीने तुम्ही राजस्थान राज्यातील या तीनही ठिकाणी अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुमची ट्रिप प्लॅन करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News