अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-आंध्रप्रदेशमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातच लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या राजाहमुंद्री शहरात ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडली आहे. घटनेतील दोन्ही विद्यार्थी हे अल्पवयीन असून शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत.
या दोघांनीही आपल्याच वर्गात एकमेकांशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. मुलगा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दोरा बांधतांना दिसत आहे. हा व्हिडिओ मुलीच्या चुलत बहिणीने काढल्याची माहिती मिळत आहे.
हा व्हिडीओ नेमका व्हायरल कसा झाला, याचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. चौकशीअंती हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला विनंती करून लवकर वर्गात आले होते, अशी माहिती मिळत आहे. परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved