अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट आलं आहे. सुशांतकडे घरकाम करणाऱ्या नीरज सिंहने चौकशीत सुशांतशी निगडीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
सुशांत अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा दावा त्याने यावेळी केला. सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी आपल्या घरात आनंदी, रिया, आयुषसोबत पार्टी करायचा. या पार्ट्यांदरम्यान सुशांत दारू आणि गांजा, सिगारेट ओढायचा.
सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजा सिगारेटचा रोल बनवायचा. कधीकधी मीही रोल करून देत होतो. मी तीन दिवस सुशांतसाठी रोल बनवत होतो. हे रोल घरात जिन्याच्या खालील कपाटात एका सिगरेट केसमध्ये ठेवले होते.
सुशांत सरांच्या मृत्यूनंतर मी तो सिगारेटचा बॉक्स पाहिला. तेव्हा तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटलं आहे. मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात नीरजने ही माहिती दिली.
मृत्युच्या काही दिवस आधी त्याने सुशांतसाठी गांजाचे रोल बनवून दिले होते. सुशांतचा मृतदेह आढळला त्या दिवशी त्याने चरस ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला.
तेव्हा तो बॉक्स नीरजला रिकामा आढळून आला होता. हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नीरजने मुंबई पोलिसांना तीन पानांचा जबाब दिला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved