अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-दीपिका पादुकोण सोशल मीडियावरून सातत्याने सक्रिय असल्याची दिसून येते.ती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आता दीपिकाने असं काही केलय कि तिच्या चाहत्यांना धक्काच बसलाय. तिने तिच्या अकाउंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून तिचे इंस्टाग्राम,फेसबुक आणि ट्विटर अकाउंट पूर्णपणे खाली असल्याचे कळतय.
नवीन चित्रपटाच्या प्रमोशसाठी हा फंडा असल्याचे प्रथमदर्शनी तरी वाटत आहे. दीपिका सध्या राजस्थानमधील रणथंबोर येथे पती रणवीर सिंह याच्यासोबत नवीन वर्ष साजरे करत आहे.
या सर्व घटना चालू असताना दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या पोस्ट दिलीत केल्या आहेत. दीपिकाचे इंस्टाग्रामवर ५२ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स असून ट्विटरवर पण तिचा लाखोंचा फॅन फॉलोवर्स आहे.
तिने हा निर्णय अचानक का घेतला? ते अजूनही कळलेले नाही. नेमक काय आहे ‘हे’ कारण दीपिकाच्या अकाउंट संदर्भात नेमक काय झालाय ते अजूनही कळलेले नाही.काही तांत्रिक कारणाने झाले,
प्रमोशनचा फंडा आहे की नवीन वर्षाचा तिने सोशल मीडियापासून लांब राहायचा संकल्प केलाय ते अजूनही कळलेले नाही. दीपिकाने याआधीही काही केलेल नाही. दीपिका तिच्या आगामी प्रोजेक्ट,चित्रपटाबद्दल या माध्यमातून माहिती देत असते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved