Electric Scooter : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादनावर अधिक भर देत आहेत.
आता अनेकजण पेट्रोल -डिझेलवरील वाहनांना रामराम करत आहेत. कारण बाजारात आता अनेक इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध झाली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्तता मिळत आहे.
बाजारात अशी इलेक्ट्रिक स्कूटर आली जी १० रुपयांमध्ये १०० किलोमीटरपर्यंत रेंज देत आहे. त्यामुळे वीजबिलाही जास्त येणार नाही आणि पेट्रोल-डिझेलचे पैसेही वाचतील.
कोमाकी फ्लोरा असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. ही स्कूटर स्मार्ट फीचर्ससह अतिशय स्मार्टपणे लॉन्च करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया…
कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर
ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. स्कूटरने उच्च श्रेणी आणि बजेट आधारित इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून नाव कमावले आहे. एवढेच नाही तर त्याचे फिचर्सही अतिशय मजबूत देण्यात आले आहेत.
शक्तिशाली बॅटरी आणि उत्तम बॅटरी पॅक
कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 80 ते 100 किलोमीटरची रेंज देते. तसेच या स्कूटरची बॅटरी ४ ते ५ तासांत पूर्ण चार्जिंग होते. बॅटरीमध्ये 3000 डब्ल्यू पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे.
वैशिष्ट्ये
या स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, पुश बटन स्टार्ट, क्रूझ कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांसह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्याची ब्रेकिंग सिस्टीम देखील अतिशय अप्रतिम देण्यात आली आहे.
किंमत
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कंपनीने फक्त 78,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तर यासाठी आणखी पैसे मोजावे लागतील.