सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी कशाला हिल स्टेशन आणि डोंगरदऱ्या? भारतातील ‘या’ गावांमध्ये घालवाल सुट्टी तर मनाला मिळेल अनोखा निवांतपणा आणि शांतता

पर्यटनाच्या दृष्टिकोभारतामध्ये काही गावे अशी आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जर सुट्टीत फिरायला गेलात व काही दिवस तिकडे थांबलात तर तुमच्या मनाला निरव अशी शांतता मिळते. कारण या गावांमधील वातावरण खूप शांत असून त्या ठिकाणी मन प्रसन्न होण्यास खूप मदत होते व लोकांची गर्दी देखील जास्त नसते.

Ajay Patil
Published:

Tourist Village In India:- भारत हा असा देश आहे की जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाला मिळाले नाही इतके निसर्ग सौंदर्याचे देण भारताला लाभले आहे. त्यामुळे दरवर्षी भारताला लाखोंच्या संख्येने विदेशी पर्यटक भेट देत असतात. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्यटन स्थळे असून यामध्ये हिल स्टेशन तसेच धबधबे, सुंदर असे डोंगर दऱ्या तसेच गडकिल्ले इत्यादींचा समावेश आपल्याला करता येईल.

त्यामुळे भारतातील लोक देखील मोठ्या प्रमाणावर सुट्टीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतात. परंतु तुम्हाला जर परत परत डोंगर दऱ्या, हिल स्टेशन किंवा इतर ठिकाणी फिरायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही भारतातील काही प्रमुख गावांना भेट देऊ शकतात.

पर्यटनाच्या दृष्टिकोभारतामध्ये काही गावे अशी आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जर सुट्टीत फिरायला गेलात व काही दिवस तिकडे थांबलात तर तुमच्या मनाला निरव अशी शांतता मिळते. कारण या गावांमधील वातावरण खूप शांत असून त्या ठिकाणी मन प्रसन्न होण्यास खूप मदत होते व लोकांची गर्दी देखील जास्त नसते.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भारतातील ही गावे आहेत विशेष

1- मलाना- हे गाव पार्वती खोऱ्यात वसलेले असून हिमालयातील दिसणाऱ्या सुंदर दृश्यांसाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या खास संस्कृतीसाठी ओळखले जाते. या गावाला टॅबूजचे गाव असे म्हणून देखील ओळखतात. या ठिकाणचे रहिवासी खूप प्राचीन प्रथा पाळतात आणि बाहेरील लोकांशी कमीत कमी संवाद साधण्याला प्राधान्य देतात.

तुम्हाला जर प्रवास करण्यासोबतच भारतातील ग्रामीण संस्कृती जवळून पाहायची असेल व काही अभ्यास करायचा असेल तर या गावाचा प्रवास तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला दगडी घरे पाहता येतात व गच्चीवरील शेती म्हणजेच टेरेस फार्मिंग पाहण्याची संधी मिळते व तुम्ही या ठिकाणी ट्रेकिंग देखील करू शकतात.

2- झिरो व्हॅली (अरुणाचल प्रदेश)- तुम्हाला जर नैसर्गिक सौंदर्याने नटलेले नंदनवनाची अनुभूती घ्यायची असेल तर अरुणाचल प्रदेश राज्यातील झिरो व्हॅली हे गाव एक उत्तम पर्याय ठरू शकते. या ठिकाणी असलेले हिरवीगार भात शेती आणि डोंगरांनी वेढलेल्या भारतातील सुंदर गावांमध्ये झिरो व्हॅलीचे गणना केली जाते.

या ठिकाणी आपटनी जमातीचे लोक राहतात. ही जमात या ठिकाणी कित्येक शतकांपासून राहत असून हे गाव अनोख्या शेती तंत्रासाठी आणि संगीत महोत्सवांसाठी देशात आणि संपूर्ण जगात ओळखले जाते. या गावात मोठ्या प्रमाणावर संगीत महोत्सव आयोजित केला जातो व त्यासोबत तुम्ही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद देखील घेऊ शकतात.

3- किब्बर(हिमाचल प्रदेश)- हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यात चार हजार 270 मीटर उंचीवर वसलेले एक सुंदर असे गाव आहे. मोठमोठ्या डोंगरांनी वेढलेल्या या गावात तुम्हाला पांढऱ्या रंगाची घरे पाहायला मिळतात. ज्या लोकांना प्रवास करण्याची आवड असते त्या लोकांच्या यादीमध्ये हे गाव पहिल्या स्थानावर आहे.

या गावाला गेल्यावर तुम्हाला प्रसिद्ध मठ, किब्बर वन्यजीव अभयारण्य आणि जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस पाहायला मिळते. तसेच तुम्हाला मानसिक आणि आंतरिक शांतता जाणून घेण्यासाठी या गावाला एकदा भेट देणे गरजेचे आहे. जी शांतता तुम्हाला शहरी जीवनशैलीमध्ये कधीच मिळू शकणार नाही.

4- खिमसर- हे गाव थार वाळवंटाच्या अगदी जवळ वसलेले असून हे गाव प्रामुख्याने वाळूच्या ढिगार्‍यांच्या सौंदर्याकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक गाव आहे. या गावाचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

या ठिकाणी भेट दिल्यावर तुम्हाला सोळाव्या शतकात बांधलेला खिमसर किल्ला पाहण्याची संधी मिळते. जो किल्ला आता हेरिटेज हॉटेल आहे. तसेच तुम्ही या ठिकाणी गेल्यावर उंट सफारी आणि सुंदर अशा सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात.

5- मावलीनांग- हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते व हे एक प्राचीन गाव आहे. या गावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणच्या रस्ते फुलांनी सजलेले असून या गावात तुम्हाला बांबूंच्या झोपड्यांचे अनोखी घरे पाहायला मिळतात.

या गावाजवळ एक लिविंग रूट ब्रिज असून तो पाहण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. या गावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाचा साक्षरता दर शंभर टक्के आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe