कशाला जाता स्वित्झर्लंड फिरायला? भारतातच आहेत ‘हे’ मिनी स्वित्झर्लंड! एकदा जाल फिरायला तर जातच रहाल

स्वित्झर्लंड वगैरे ठिकाणी भेट देण्याऐवजी जर तुम्ही भारतातील मिनी स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळांना  भेट दिली तर तुम्ही तुमच्या दररोजच्या धावपळीच्या जीवनशैली पासून काही कालावधीसाठी स्वतःला मुक्त करू शकतात व जीवनाचा खरा आनंद या ठिकाणांना भेट देऊन घेऊ शकतात.

Published on -

भारतामध्ये जर तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणत्याही राज्यांमध्ये प्रवास केला तरी तुम्हाला प्रत्येक राज्यांमध्ये सुंदर अशी निसर्गाने समृद्ध असलेली पर्यटन स्थळे दिसून येतात. भारतामध्ये प्राणी संपत्ती पासून तर नैसर्गिक साधन संपत्ती पर्यंत अनेक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते व ती विविधता भौगोलिक परिस्थितीत देखील दिसते.

यामुळे भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याकारणाने देश-विदेशातील लाखो पर्यटक दर वर्षी भारताला भेट देत असतात. तसेच आपल्यापैकी बरेच जण देखील देशांतर्गत  पर्यटन तर करतातच परंतु बरेच व्यक्ती हे पर्यटनासाठी स्वित्झर्लंड तसेच मलेशिया इत्यादी ठिकाणी जातात.

परंतु त्याऐवजी भारतामध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत की ते स्वित्झर्लंडला देखील लाजवतील या प्रकारच्या नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेली ही ठिकाणे भारतातच आहेत. त्यामुळे स्वित्झर्लंड वगैरे ठिकाणी भेट देण्याऐवजी जर तुम्ही भारतातील मिनी स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळांना  भेट दिली तर तुम्ही तुमच्या दररोजच्या धावपळीच्या जीवनशैली पासून काही कालावधीसाठी स्वतःला मुक्त करू शकतात व जीवनाचा खरा आनंद या ठिकाणांना भेट देऊन घेऊ शकतात.

 भारतातील ही ठिकाणी आहेत मिनी स्वित्झर्लंड

1- खज्जीयार हे एक अतिशय सुंदर असे ठिकाण असून ते हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये आहे. तसे पाहिला गेले तर हे एक छोटेसे गाव असून या ठिकाणी असलेला खज्जीआर तलाव तुम्हाला चित्रपटांमध्ये दाखवलेल्या काही स्थानांची आठवण करून देतो. या ठिकाणी खोल अशा सुंदर निसर्गाने समृद्ध असलेल्या टेकड्या आणि दऱ्या तुम्हाला पाहायला मिळतात.

ज्यांना ट्रेकिंग करण्याचा छंद आहे अशांसाठी हे ठिकाण खूप फायद्याचे आणि महत्त्वाचा पर्याय आहे. रोजच्या जीवनशैलीतून तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट देणे गरजेचे आहे. येथे एक तलाव असून ज्या तलावाचे पाणी हिरवे आणि निळ्या रंगांमध्ये दिसते.

2- औली उत्तराखंड राज्यांमधील हे ठिकाण भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते व उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यामध्ये आहे. स्किंइग आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात.

या ठिकाणी असलेले अनेक नैसर्गिक ठिकाणे निसर्गाने समृद्ध असून या ठिकाणी पर्यटकांना  आकर्षित करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दर्शनासाठी या ठिकाणी नंदादेवी मंदिर असून कैलास मानसरोवर यात्रा या ठिकाणी सुरू होते.

3- जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरला देखील भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते व हिवाळ्यात या ठिकाणी पांढऱ्या बर्फाच्या चादरीने झाकलेले नैसर्गिक दृश्य पाहण्यात वेगळीच मजा असते. विदेशातील अनेक पर्यटक दरवर्षी लाखोंच्या संख्येत जम्मू आणि काश्मीरला भेट देत असतात.

या ठिकाणचे प्रमुख आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेले सरोवर होय व हिवाळ्यात हे एक प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. हिवाळ्यामध्ये हे सरोवर इतके गोठते की लोक त्यावर चालत देखील जाऊ शकतात. श्रीनगर, पहिलगाम तसेच गुलमर्ग यासारखे ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News