अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अनेकांना व्यसनाची सवय लागलेली असते. व्यसनापायी अनेकांना आपला रोगात देखील गमवावा लागतो. या व्यवसानाला बंदी घालण्यासाठी म्हणजेच काहीसा आळा बसावा यासाठी देशातील एका राज्यात एक योजना राबवण्यात येत आहे.
झारखंड सरकारने सरकारी नोकरीसाठी एक अनोखी अट ठेवली आहे. राज्य सरकारने म्हटलं आहे की सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही किंवा भविष्यात ते या पदार्थांचं सेवन करणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल.
पुढील वर्षी 1 एप्रिलपासून झारखंडमध्ये हा नवीन नियम लागू होणार आहे. हा नियम त्याच उमेदवारांसाठी असेल, जे झारखंड सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरीसाठी अर्ज करत आहेत.
गेल्या मंगळवारी रांची येथे झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.यामुळे नवीन पिढीला तंबाखूचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी मदत होईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved