‘सुशांत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांची होऊ शकते हत्या’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. 

परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI कडे सोपावण्यात यावा या मागणीनेही जोर धरला होता. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत.

आता सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज सिंह बबलू यांनी धक्कादायक वक्तव्य करत चिंता व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित साक्षीदार जे माध्यमांकडे येत आहेत आणि त्यांचे मुद्दे ठेवत आहेत, त्यांचीही येत्या काही दिवसात हत्या केली जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

एका रिपोर्टनुसार नीरज सिंग बबलू म्हणाले,सुशांतच्या प्रकरणात दररोज नवीन साक्षीदार येत आहेत जे नवीन तथ्य समोर आणत आहेत. अशा लोकांना आपली माहिती सीबीआयला ही द्यायची आहे.

या अशा साक्षीदारांची हत्या होण्याची शक्यता आहे.” मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करताना, अशी मागणी केली की सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील साक्षीदारांना मुंबई पोलीस  सुरक्षा का देत नाही? त्यांनी या साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment