८ ऐवजी १२ तास होणार कामाची वेळ

Published on -

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गाला रोखण्यासाठी जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. या लॉकडाऊनमधून सूट मिळण्यानंतर संबंधित उद्योगांना झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अनेक राज्यांनी फॅक्टरी कायद्यातील आठ तासांच्या कामाची वेळ वाढवून १२ तास केली आहे.

काही राज्यांनी अतिरिक्त तासांसाठी दुप्पट वेतन देण्याचा निर्णयही घेतला आहे. कारखान्यांमध्ये काम करताना व्यक्तींमध्ये अंतर ठेवून काम करण्याचा विचार केला गेला व त्यानुसार ते काम करावयाचे असल्याने अन्य बाबीही स्वीकारल्या जात आहेत. एकूण या संबंधातील नियमांबाबत काही कंपन्यांनी विरोधही केला आहे. अतिरिक्त तासांसाठी दुप्पट मजुरी देण्याबद्दलही विरोध केला जात आहे.

सरकारी दिशादर्शक नियमांनुसार, अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त असलेल्या वस्तू व सेवेच्या पूर्ततेसाठी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले टाकली जात आहेत. कमी कर्मचारी संख्येने व विलगीकरणाबाबत विशिष्ट अंतर व्यक्ती व्यक्तींमध्ये ठेवून काम करण्याच्या नियमाद्वारे सरकारने सूचित केले आहे.

राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांनी आधीच घोषणा केली व काम सुरू केले आहे. पंजाबच्या कामगार विभागाचे मुख्य सचिव विजय कुमार जांजुआ म्हणाले की, कामाचे तास वाढवण्याबाबत उद्योगांनी केलेली मागणी सरकारने मान्य केली आहे आणि येत्या काही दिवसांत याबाबत अधिसूचना जारी केली जाईल.

कामाचे ८ तास आहेत त्याऐवजी ते बारा तासांपर्यंत केले जाईल व अतिरिक्त तासांचे मानधन दुप्पट केले जाईल. ते म्हणाले की, या निर्णयामुळे कामगारांना जास्तीत जास्त पैसे मिळवण्याची संधी मिळेल. लॉकडाऊनमध्ये केवळ त्या कारखान्यांना, ज्यांचे कामगार त्याच परिसरातील रहिवासी आहेत त्यांना काम करण्याची परवानगी आहे. यामुळे कामगार टंचाईवर तोडगा निघाल्यासारखी मदत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!