अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- वृत्तसंस्था कोरोना कसा होतो, आणि त्याचे विषाणू शरिरात कोठून कोठून प्रवेश करतात, याविषयी आतापर्यंत अजब माहिती आपण ऐकली असेल. त्यातच कोरोना हवेतून होतो, अशी माहिती पुढे आली आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले.
मात्र या भितीदायक माहितीमध्ये काहीच तथ्य नसून कोरोनाचा फैलाव हवेतून होत नाही, असा दावा औरंगाबादचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांनी केलाय. दरवाजे, कडी-कोंडे, टेबल, भांडी, नोटांचा कागद, किराणा पार्सल्स याद्वारेही कोरोना पसरण्याची भीती असते.
हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही. रुग्णालयात एसी न वापरता खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवली जाते. अशा हवेतून कोरोनाचा रोगप्रसार होत नाही. एसीमध्ये हवा खेळती नसल्यामुळे रोग प्रसार होण्याची शक्यता वाढते, असे औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येथील मराठी विज्ञान परिषदेने कोरोनावर वेबिनारचे आयोजन केले होते. पैसे आणि किराणा मालाचे पार्सल, त्याची पाकिटे यावर सॅनिटायझर शिंपडून घ्यावे आणि पाच तासांनंतर वापरावे. कारण या विषाणूचा संसर्ग संपर्क काळ साधारण पाच तासांचा असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, कोरोना चार प्रकारे पसरत असल्याचे सांगून डॉ. गर्गे म्हणाले, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोरोना पसरू शकतो. अनेक विषाणू एका ड्रोपलेटच्या माध्यमातून ६ फूट अंतरापर्यंत प्रवास करू शकतात.
श्वासोच्छ्वास, शिंक यात स्वतंत्र विषाणू हवेत तरंगत ३० फूट अंतरापर्यंत प्रवास करतात; असाही कोरोना पसरू शकतो. भाज्या, पैसे, किराणा यातून संसर्ग होऊ शकतो. हे पदार्थ हाताळताना जर तो व्यापारी कोरोनाग्रस्त असेल किंवा कोरोनाचा वाहक असेल तर संसर्ग होऊ शकतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा