‘या’ देशांमधील पेट्रोलचे दर ऐकून तुम्ही व्हाल आश्चर्य चकित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-भारतात दर दिवसाला पेट्रोल – डिझेलचे दर वाढत असल्याने महागाची झालं सोसत असलेल्या जनतेची कंबरडे मोडले आहे. जनता महागाईमुळे हैराण झाले आहे मात्र इंधनाचे दर काही केल्या कमी होताना दिसत नाही.

मात्र जगात काही असे देश आहे ज्या ठिकाणी पेट्रोल – डिझलचे दर अत्यंत अल्प आहे. चला तर माग आपण जाणून घेऊ व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत फारच कमी आहे. तिथे 4 जानेवारीपासून पेट्रोल जानेवारीपासून पेट्रोल एक रुपये ४६ पैसे रुपये प्रति लिटर किमतीला विकले जात आहे. दुसऱ्या क्रमांकावर इराण आहे.

या देशात एक लीटर पेट्रोलसाठी 4.24 रुपये मोजावे लागतात, तर अंगोलामध्ये 17.88 रुपये प्रति लीटरने पेट्रोल विकले जात आहे. भारतातील बाजारात बिसलेरीच्या एका बाटलीची किंमत 20 रुपये आहे.

त्यामानाने या तीन देशात पेट्रोलचे दर अत्यंत कमी आहेत. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये 68.91 रुपये, अमेरिकेमध्ये 50.13 तर रूसमध्ये 42.69 रुपये प्रति लिटर पेट्रोल विकले जाते.

या देशात भारतापेक्षाही महाग आहे पेट्रोल :- हाँगकाँगमध्ये 169.21 रुपये प्रति लिटर, सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये, सीरिया 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये 140.90 रुपये, नॉर्वेमध्ये 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये 133.90 रुपये पेट्रोलचे दर आहेत. तसेच इंग्लंडमध्ये पेट्रोल 116 रुपये, स्वित्झरलँडमध्ये 115 रुपये, जर्मनीमध्ये 116 रुपये, जपानमध्ये 93.62

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe